मालमत्ता कराच्या दंडावर संपूर्ण सवलत
३१ जानेवारीपर्यंत कर भरण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन
    ठाणे : महापालिकेचा थकीत आणि चालू वर्षांचा मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरा
    आणि दंडाच्या रकमेवर शंभर टक्के सवलत मिळावा, अशी योजना महापालिकेने
    राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुटीच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू
    ठेवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
  
  
    करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने सर्वत्र टाळेबंदी
    लागू केली. या काळात नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले होते. टाळेबंदी
    शिथिलीकरणानंतर बाजारपेठा, दुकाने आणि उद्योगधंदे सुरू झाले आहेत. असे असले तरी
    आजही अनेक नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर
    थकीत मालमत्ता कराच्या दंडाच्या रकमेवर सवलत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने
    घेतला असून यामुळे थकबाकीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. Read More...
  
 

 
.jpg) 
 
 
						 
						.jpg) 
 
 
						
No comments:
Post a Comment