Committed for Timely Service!

Saturday 20 February 2021

Will stamp duty be extended?

मुद्रांक शुल्क सवलतीत मुदतवाढ होईल का?

मालमत्ता व्यवहार करताना त्या व्यवहाराची एकूण किंमत म्हणजे विकासकाने आकारलेला दर आणि मुद्रांक शुल्क असे असते.

महाराष्ट्र सरकारच्या ऑगस्ट  २०२० मधील  निर्णयामुळे मुद्रांक शुल्क कमी करून स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ग्राहकांना दिलासा देण्यात आला. सरकारच्या या निर्णयानुसार मुद्रांक शुल्क कमी झाले. दोन टप्प्यांमध्ये ही सवलत होती, ती पुढीलप्रमाणे-

१. १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या  काळासाठी मुद्रांक शुल्कामध्ये ३% घट.

२. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठी मुद्रांक शुल्कामध्ये २% घट.

इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच स्थावर मालमत्ता क्षेत्रालाही करोना परिस्थितीचा सामना करावा लागला. बरेच गृहप्रकल्प त्यामुळे रखडले.  ग्राहकांचा ओघ आटला. करोना संकटाचा अनेकांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाल्यामुळे ग्राहक अनुत्सुक होते. पण ही परिस्थिती पूर्णपणे करोना काळात निर्माण झाली असे नाही, तर त्याआधीही कित्येक प्रकल्प बांधून तयार होते, पण विकले गेले नव्हते. बरेच ग्राहक हे किंमत आणखी कमी होईल या आशेवर मालमत्ता खरेदीचा निर्णय पुढे ढकलत होते. याचा परिणाम बांधून विक्रीसाठी तयार अशा प्रकल्पांची संख्या वाढण्यात झाला. अपेक्षेइतकी विक्री नसल्यामुळे विकासकांचे पैसे प्रकल्पात अडकले गेले आणि या क्षेत्रावर मंदीचे सावट आले.Read More...


No comments:

Post a Comment