Committed for Timely Service!

Tuesday 29 December 2020

Buildings damaged due to stubborn tenants crash

हट्टी भाडेकरूंमुळेच मोडकळीस आलेल्या इमारती दुर्घटनाग्रस्त 

घाटकोपर येथील इमारतीवर कारवाईचे आदेश देताना उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणे रहिवाशांसह इमारतीच्या परिसरातून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी किती धोकादायक असते याची जाणीव असून हट्टी भाडेकरू, रहिवाशांमुळे या इमारतींवर वेळीच कारवाई होत नाही. परिणामी मुंबईसह राज्यातील अनेक इमारती दुर्घटनाग्रस्त होऊन त्यात अनेकांना जीव गमावावा लागला आहे, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले.

घाटकोपर पश्चिम येथील संघानी इस्टेटमधील अविचल-२ या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या सदस्यांनी पालिकेच्या कारवाईविरोधात तातडीचा दिलासा मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांनी रहिवाशी आणि त्यांच्या वकिलांच्या कारवाईला विलंब करण्याच्या भूमिकेवर ताशेरे ओढत रहिवाशांना दिलासा देण्यास नकार दिला. Read More...




No comments:

Post a Comment